
जळगाव मिरर । १५ जानेवारी २०२३ ।
अमळनेर तालुक्यातील एका गावातून हजारो रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नंदगाव येथील रहिवासी असलेल्या योजनाबाई अशोक पाटील व सुभाष बारकू पाटील यांच्या राहत्या घराच्या ओट्यावर ठेवलेला ८ हजार ४०० रुपयांचा सामान दिनांक 13 रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला आहे. प्रकरणी सुनंदाबाई प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पाटील हे करीत आहे.




















