
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
मतदान केंद्रात पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या चोपडा तालुक्यातील हातेड येथील शरद खंडू रोकडे (३४) याला अमळनेर जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली.

मिळालेली माहिती अशी कि, जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी हातेड बुदूक, ता. चोपडा येथील जि.प. शाळेत मतदान सुरू होते. त्याठिकाणी शरद रोकडे हा दारूच्या नशेत मतदानासाठी आला. मतदान कार्ड नसल्याने त्यास अधिकाऱ्यांनी मतदान करू देण्यास नकार दिला. यावरून अधिकाऱ्यांशी तो हुज्जत घालू लागला. नेमणुकीस असलेले पोका रमेश शिवाजी खोपडे यांना वाद मिटविण्यासाठी बोलावले. त्यावेळी आरोपी हा खोपडे यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करू लागला, त्यांची कॉलर पकडली होती.




















