
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील एका परिसरातून दोन दुचाकीवर धूमस्टाईल आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी असलेल्या सुनिता गोकुळ बोरसे (वय ४९) या दि ७ रोजी रात्रीच्या सुमारास अंगणात असतांना दुचाकीवर अंदाजे २५ वर्षीय दोन तरुण येत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ज्याची किमत ५० हजार रुपये असून त्याची चोरी करीत पळ काढला, या प्रकरणी दोन चोरट्याविरोधात अमळनेर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोउनी नरसिंग वाघ हे करीत आहेत.




















