जळगाव मिरर / २७ फेब्रुवारी २०२३ ।
प्रत्येक लोकांच्या आयुष्यात स्मार्टफोनचा वापर इतका वाढला आहे की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्याच गोष्टीसाठी लोक फोन वापरु लागले आहेत. बालकापासून ते थेट वयोवृद्धपर्यत हि जणू सवयच लागली आहे. त्यामुळे हाच फोन तुम्हाला एक दिवस घातक ठरू शकतो.
स्मार्टफोनला स्वतःपासून वेगळं करणं लोकांसाठी आता जवळ-जवळ अशक्यच झालं आहे. लोकांना कोणतंही काम नसलं तरी देखील ते फोन स्क्रोल करत बसतात. लोक फोनला नेहमीच आपल्या खिशात ठेवतात. अनेक वेळा पुरुष मंडळी घरात असताना किंवा घराच्या बाहेर देखील आपल्या खिशात फोन ठेवतात.
पण असं करण्याचे किती नुकसान आहेत हे तुम्हाला नक्कीच माहित नसावे. फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोयफोन खिशात ठेवण्याचे काय तोटे आहेत? चला पाहू तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही फोन तुमच्या खिशात ठेवता, तेव्हा तुम्हाला शरीराला 2 ते 7 पट रेडिएशनचा सामना करावा लागतो. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की फोन रेडिएशन देखील कर्करोगाचे एक कारण मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे रेडिएशन तुमची डीएनए रचना बदलू शकते. यामुळे नपुंसकत्वाचा धोका असतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही तुमच्या पँटच्या खिशात सेलफोन ठेवलात तर त्याच्या रेडिएशनमुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच यामुळे पुरुषांना नपुसंकता देखील येऊ शकते.
मग स्मार्टफोन ठेवायचा कुठे? तुम्ही फोन पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवलं तर ते जास्त चांगलं होईल. तुमच्या शरीरापासून आणि त्वचेपासून फोन लांब राहिल असं पाहा. जर काही वेळा हे देखील शक्य नसेल तर सेलफोन मागील खिशात ठेवा. तसेच हे देखील लक्षात ठेवा की त्याची मागील बाजू वर राहिली पाहिजे जेणेकरून तुमचे शरीर त्याच्या किमान रेडिएशनच्या संपर्कात येईल.
(वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे जळगाव मिरर न्यूज याची कोणतीही पुष्टी करत नाही)
