जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।
भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी एप्रिल १८, इ. स. १८५३ रोजी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रेल्वेगाडीचा वापर होवू लागला पण त्यावेळेस नागरिकांनी रेल्वे गाडीचा वापर हा प्रवासासाठी करीत असतांना रेल्वे कशी स्वच्छ राहील याकडे सुद्धा बघितले. गेल्या काही वर्षांत रेल्वे सुविधांमध्ये अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी घाणीच्या बाबतीत अजून बऱ्याच समस्या देखील आहेत. राजधानी एक्स्प्रेस ते गरीबरथ आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी त्यात पसरलेल्या घाणीमुळे त्रस्त आहेत.
याबाबतीत ट्विटरव्यतिरिक्त रेल्वे मदद ॲपवरही लोक भारतीय रेल्वेकडे तक्रार करत आहेत. आज आम्ही अशा 10 गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यात रेल्वेला अस्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी मिळालेल्या आहेत. जर तुम्हीही या गाड्यांमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा.
रेल मदद ॲपवर आलेल्या तक्रारींनुसार, सहरसा-अमृतसर गरीब रथ ट्रेन घाणीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ही ट्रेन पंजाबमधील अमृतसरहून बिहारच्या सहरसा जिल्ह्यात जाते. ही गाडी दोन्ही बाजूंनी धावते. या गाडीत घाणीच्या सर्वाधिक 81 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. डब्यांपासून सिंक आणि टॉयलेटपर्यंत घाण पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ही ट्रेन देशातील सर्वात वाईट सुविधा असलेल्या रेल्वेमध्ये गणली जाते.
त्यानंतर जोगबनी-आनंद विहार सीमांचल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 67, श्री माता वैष्णोदेवी-वांद्रे स्वराज एक्स्प्रेसमध्ये 64, वांद्रे-श्री माता वैष्णोदेवी स्वराज एक्स्प्रेसमध्ये 61 आणि फिरोजपूर-अगरतला त्रिपुरा सुंदरी एक्स्प्रेसमध्ये 57 तक्रारी प्राप्त झाल्या. या गाड्यांमध्ये अस्वच्छता आणि घाण पसरणे आणि स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या आनंद विहार-जोगबनी सीमांचल एक्स्प्रेसमध्ये घाणीच्या 52 तक्रारी, अमृतसर क्लोन स्पेशल ट्रेनमध्ये 50, अजमेर-जम्मूतवी पूजा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 40 आणि नवी दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेस ट्रेनमधील घाणीशी संबंधित 35 तक्रारी आल्या आहेत. महिन्याभरात या 10 गाड्यांमध्ये एकूण 1079 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात घाण, पाण्याची अनुपलब्धता, ब्लँकेट व चादरींची घाण आणि फाटलेल्या सीटच्या तक्रारींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे घाणीच्या तक्रारी पूर्व भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमधून आल्या. मुंबईहून माता वैष्णोदेवी कटाराकडे जाणाऱ्या गाड्याही अस्वच्छ असल्याचे आढळून आले. एक्स्प्रेस गाड्यांबरोबरच राजधानी एक्स्प्रेस ट्रेनमध्येही घाण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, घाण दूर करण्यासाठी आता ट्रेनमध्ये ऑन बोर्ड हाऊस कीपिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत तक्रार मिळताच तात्काळ ट्रेनमध्ये त्याची विल्हेवाट लावली जाते.