जळगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त वाहनांना जळगाव महानगराच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह लावून स्कुल व्हॅनच्या आघाडीतर्फे स्थापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, व जळगाव महानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन महानगर आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ वाणी तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महानगरचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे, व भाजपा हॉकर्स महानगर आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे व इतर उपस्थित होते.




















