जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२६
पद्मश्री, खासदार तथा विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल देवराव निकम यांची नाळ जळगावशी जुळलेली आहे. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या न्यायव्यवस्थेसंदर्भात फार महत्त्वाची भूमिका आहे. आणि याचा जळगावकरांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन प्रवासाचं सर्वांनाच कुतूहल आहेत.यांच्या बालपणापासून ते देशभर गाजलेल्या बॉम्बस्फोट सह २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह महत्त्वपूर्ण खटल्यांपर्यंतचा जीवनप्रवास आकाशवाणी जळगावच्या विशेष मुलाखतीतून उलगडणार आहे.
आकाशवाणी जळगाव केंद्राच्या ‘स्पंदन : वृत्त आणि व्यक्तींच’ या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार शुभदा नेवे यांनी ॲड. निकम यांची ही विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांचे बालपण, जळगावमधील सुरुवातीचे दिवस, मुंबईपर्यंतचा प्रवास, वकिली क्षेत्रातील कारकीर्द आणि गाजलेल्या खटल्यांमधील अनुभवांना उजाळा देण्यात आला आहे.

या मुलाखतीचे प्रसारण सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.२५ वाजता आकाशवाणी जळगावच्या १०२.१ एफएम आणि ९६३ किलोहर्ट्झवर तसेच न्यूज ऑन एअर आणि वेव्हज ॲपवरून होणार आहे. आकाशवाणीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही ही मुलाखत पाहता येणार आहे.
आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासह आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विजय भुयार, आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक नरेंद्रकुमार ठाकूर तसेच महाराष्ट्र पर्यटनचे राजेश भागवत आणि अमेय नेवे यांचे सहकार्य लाभले आहे.




















