जळगाव : प्रतिनिधी
पुण्यात शिक्षण घेणारे जळगावातील दोन तरुणाचा बुधवारी रात्री मित्रांसोबत जेवण करून घरी जात असताना कात्रजजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघातामुळे जळगावात मोठी शोककळा पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील गांधीनगरात राहणारा रोहित शामसुंदर मणियार वय-२२ व समीर काळे वय-२४ हे दोन्ही तरुण पुण्यात उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले होते. बुधवारी ७ मित्र जेवणासाठी कात्रज परिसरात गेले होते. रात्री जेवण आटोपल्यावर ५ मित्र चारचाकीने घराकडे निघाले तर रोहित आणि समीर दुचाकीने जात होते.
कात्रजजवळ झालेल्या अपघातात दोघांचा पहाटे ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मणियार, काळे परिवारासह जळगावात शोककळा पसरली.




















