
जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३ ।
देशभरात अनेक भागात सोशल मिडीयाच्या माध्यामातून जनतेला लुटण्याचे प्रमाण वाढत असतांना आता पुन्हा एकदा नव्या प्रकरणाची चर्चा राज्यभर होवू लागली आहे. त्यासोबतच सोशल मिडीयावर अनेक ठिकाणी आपण व्हिडीओ बनवून जर टाकला व तो व्हायरल झाल्यास त्यावर कंपनी पैसे देत असते पण या महाभागाने चक्क व्हिडीओ बघितल्यास पैसे मिळतील असे सांगून एका तरुणाची तब्बल लाखो रुपयात लुट केली आहे.
काय आहे प्रकरण ?
एका तरुणाला व्हिडीओला लाइक करा, ठरावीक रक्कम गुंतवून त्याच दिवशी दुप्पट परत मिळवा अशा आमिषातून तरुणाची आठ लाख ९६ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना १२ ते २० एप्रिलदरम्यान घडली. विभोर विनय शुक्ला (३३, रा. थेरगाव) यांच्या तक्रारीवरून लतीशा, फराह, अलीना नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
तरुणास अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप संदेश आल्यानंतर पैशांसंदर्भात आमिष दाखवून विश्वास संपादन केला. लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. टेलिग्रामवर एक ग्रुप जॉइन करण्यास सांगून वेळोवेळी पैसे मागितले.






















