
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जोशी पेठ परिसरातील एका महिलेने शुक्रवारी दुपारी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की शहरातील जोशी पेठ परिसरातील फिरदोसबी या आपल्या परिवारासोबत वास्तव्यास होत्या. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरी कुणी नसल्याचे बघून फिरदोसबी यांनी घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. काही वेळानंतर जुबेर खाटीक हे घरी आले असता त्यांना त्यांच्या पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर लागलीच नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.





















