
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात त्या मोबाइल धारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरात एक २८ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह रहायला आहे. २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान अज्ञात अनोळखी नंबर वरील व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तरूणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना धमकीचे मेसेज टाकले. व तरुणीचे असलेले फोटो डिजिटल माध्यमातून अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे याबाबत त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस स्थानकात अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















