
जळगाव मिरर | ७ मे २०२३

चाळीसगाव शहरातील भडगाव रोड परिसरातील एका घरातून अनोळखी चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शहरातील संत रोहिदास सोसायटी भडगाव रोड येथे राहणारे फोटोग्राफर सुनील बोरसे (वय ५१) यांच्या घरातून अज्ञात चोरटयांनी ६ मे रोजी दुपारी ४ ते साडे सहा वाजे दरम्यान ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या , ७० हजार रुपयांचा सोनीयाचा हार . ५ हजारांचा मोबाईल, ८ हजारांचा सॅमसंग मोबाईल, ५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानुसार सुनील बोरसे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय सुहास आव्हाड करीत आहे.




















