जळगाव मिरर | 19 ऑगस्ट 2026
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील ३८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डांभुर्णीतील पंडित नगरमध्ये ज्ञानेश्वर नंदू अहिरे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या पत्नी छायाबाई ज्ञानेश्वर अहिरे (वय ३८) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने तेथून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून छायाबाई अहिरे यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर अहिरे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत छायाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करत आहेत.




















