
जळगाव मिरर । १४ मे २०२३

सध्या प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अॅपचा वापर करीत असतो त्यातून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघड झाल्या आहे. तशीच एक घटना जळगाव शहरात घडली आहे. शहरातील एका तरुणीचे इन्स्टाग्राम हे अॅप हॅक करीत सायबर भामट्याने तरुणीच्या लॅपटॉपमध्ये शिरकाव करीत तरुणीच्या खात्यावरील लाखो रुपये गायब केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रताप नगरातील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तरुणी अनुजा श्रेयांश रायसोनी हिच्याकडील मोबाईलमधील इन्स्टाग्राम अॅप हॅक करीत सायबर भामट्याने लॅपटॉपचा ताबा घेवून पेटीएम वॉलेट व गुगल पे खात्याची माहितीचा डाटा चोरला व तरुणीच्या आयआसीआसीआय या तसेच एचडीएफसी या दोन्ही बँकेच्या खात्यावरून तब्बल तीन लाख 15 हजार रुपये आपल्या खात्यात वळते केले. फसवणूक झाल्याचा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर अनुजा हिने शनिवारी सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.




















