जळगाव : प्रतिनिधी
१० रोजी राम नवमीच्या दिवशी आम आदमी पार्टी कार्यालयात श्रीराम नवमी उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील मान्यवरांचे आम आदमी पार्टीत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर तसेच जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई यांच्या नेतृत्वाखाली सिनेमा डायरेक्टर बंटी खरात विक्रम कापडणे, दुर्गेश निंबाळकर यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्ता हेमराज सोनवने, हेमंत सोनवणे. ज्ञानेश्वर पाटील, पवन खंबायत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




















