जळगाव : प्रतिनिधी
रिद्धी जानवी फाउंडेशन व हमाल कामगिरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने रामनवमी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित असलेले मान्यवर महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी प्रभु श्रीरामा च्या नावांने जयघोष करण्यात आले. प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेची आरती व नंतर प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी रिद्धी जानवी फाउंडेशनचे अध्यक्ष सौ. चित्रा मालपाणी, सौ. अनिता लाठी सौ. ,उमा दायमा ,सौ. चंचल दायमा, कु,जानवी मालपाणी,कु,रिद्धी मालपाणी, सतीश दायमा, पुनम दायमा, शुभम दायमा, बंटी बांदल, शेखर पाटील, रविभाऊ यांची उपस्थिती होती




















