अमळनेर : विक्की उत्तम जाधव
एचएससी निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून अमळनेर तालुक्याचा निकाल एकूण ९५.९३ टक्के लागला असून ३३१९ हा विद्याथ्र्यांपैकी ३१८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलामुलींनी संमिश्र यश मिळवले असून त्यांचा ओढा आयटी मेडिकल यासह सीए याकडे जाण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. लुक्यातील एकूण २४ कनिष्ठ महाविद्यालय असून पैकी त्यांनी यशाची परंपरा चांगली राखली आहे.

प्रताप महाविद्यालयाची वाणिज्य शाखेचे विद्यार्थी कोमल प्रवीण पारख या विद्यार्थिनीने बाजी मारली असून ती ९८.१७ टक्के तिला प्राप्त झाले आहेत ती उत्तर महाराष्ट्र प्रथम आली असून अभय जितेंद्र काळे हा विद्यार्थी दुसरा आला आहे. त्याला ९६.५०- टक्के प्राप्त झाले आहेत. तर तिसरी कोमल राजेश पवार हिने ९३.५० टक्के गुण प्राप्त केले. विज्ञान आणि कला शाखेचा टक्का घसरला आहे




















