
जळगाव मिरर | ३१ मे २०२३

देशातील बिहार राज्यातील ५९ अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याची माहिती जळगाव व मनमाड रेल्वे स्थानकावर मिळाली असता रेल्वे पोलिसांनी त्या मुलांची सुटका केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. यात मनमाडला 30 तर जळगावला 29 मुलांची रेस्क्यू केले आहे.
बिहार राज्यातून अल्पवयीन मुलांची रेल्वेतून तस्करी करून नेत असताना रेल्वे पोलिसांनी जळगाव ते भुसावळ दरम्यान चेकिंग करतांना आढळून आले. पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 29 तर मनमाड रेल्वे स्थानकावर ३० मुलांना सोडविले आहे. पुणे व सांगली येथे या मुलांना नेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल
या घटनेत मानवी तस्करी या प्रकरणी तीन ते चार जणांना ही अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरील २९ अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावर सुटका केलेली आहे. त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.




















