जळगाव : प्रतिनिधी
जळगाव – कानळदा रोड जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी नगरातुन कानळदाकडे जाणाऱ्या हुसैनशाह शब्बीर शहा (वय-२२) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण दुचाकीने जात असतांना समोरून येणारी भरधाव कार (एमएच १९ बीजे ८३०६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हुसैन शाह यांच्या दोन्ही पाय आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. कार चालकाने मदत न करत थेट दुचाकी स्वाराला दमदाटी करून तुला काय करायचे आहे ते करून घे अशी धमकी देवून कार घेवून पसार झाला. याप्रकरणी हुसैन शाह यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल बडगुजर करीत आहे.




















