
जळगाव मिरर | ६ जून २०२३
काही लोक मला पैशांची मस्ती दाखवतात. तुमच्याकडे नोटा वाटण्याची ताकत आहे. आमच्याकडे नोटा हिसकवण्याची ताकत आहे. मी कुणाचे प्लॉट गडप केले नाहीत. घराचे पैसे खावून घरात बसलो नाही. माझ्या नावाने धरणगावचे भूत बोंबलत आहे. ही जागा शिवसेनेची आहे ना? मग ये तिकीट घे, चारीमुंड्या चित केले नाही तर बघच. माझ्या अंगात काय गर्व येईल. ती टपरी अजून विसरलाे नाही. माझ्या आयुष्यात फार वाईट अनुभव आले. ज्यांना मोठे केले ते आता मला बाबू म्हणताहेत. ‘हमने हमारे पीठ के जितने खंजीर निकाले, उतनो को गले लगाया’ असा शेरही त्यांनी ऐकवला. असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
या सभेत आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, कैलाश चौधरी, मुकुंद सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले कि, माझ्या आयुष्यात फार वाईट अनुभव आले. ज्यांना मोेठे केले ते आता मला बाबू म्हणताहेत. मी जातीचे राजकारण केले नाही. ते जातीचे राजकारण करत आहेत. मी सीजनेबल पुढारी नाही. त्या सीजनेबल पुढाऱ्यांना आता सर्वजण आठवू लागले आहेत. माझ्या नांदी लागू नका, मी माझ्या अवतारात आलो तर तुम्हाला पळणं मुश्कील होईल, ज्यांना मोठे केले, ते मला शिकवताहेत. माझ्यापासून तुम्ही फुटले असाल. जनता माझ्यासाेबत आहे. ५ जुलैला पाळधी गावाला दररोज पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनेचे टेस्टींग पूर्ण झाले आहे. माझ्यासोबत पंचवीस वर्ष नगराध्यक्ष राहिलेले धरणगावात हंडामोर्चा काढणार आहेत. गुलाबराव पाटील गद्दार असल्याचे आरोप करतात. होय मी गद्दारी केली, उठाव केला. शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी उठाव केला. उध्दव ठाकरेंशी आमचे वैर नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी चा हात पकडला म्हणून विरोध केला. पाळधीने मला ओळख दिली. मी संधीचे सोने केले. पाळधीला गुलाबराव पाटील यांची ओळख दिली असेही गर्दी पाहून मी ५७ वर्षांचा नव्हे २७ वर्षाचा झालाे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील या सभेत म्हणाले. अाता केवळ मुख्यमंत्रीपद राहिले शिवतीर्थानंतर ५ जूनची सभा आमच्यासाठी पर्वणी असते. गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख, आमदार, राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री असतानाही मी पाळधीतील सभेला आलो आहे. एवढी पदे झाली. आता केवळ मुख्यमंत्री पदच राहिले आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे मी म्हणणार नाही. नाही तर त्यांच्यासह सर्वजण माझे पाय छाटतील असे अामदा किशाेर पाटील म्हणाले. सभेप्रमाणेच माझ्या नाटकांनाही गर्दी असायची. मैदान पूर्ण भरायचे. इतकं घाण राजकारण मी कधी पाहिले नाही. आजच हा पक्ष फुटला. इतर कोणतेही पक्ष फुटले नाहीत? चाळीस लोकांना संपवून टाकू असे म्हणतात. पहिले राजीनामा द्या, असा प्रश्नही गुलाबराव पाटलांनी खासदार संजय राऊत यांना केला. तसेच शेराेशायरीने त्यांनी ही सभा चांगलीच गाजवून साेडली.





















