जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कासमवाडी परिसरात काही वादाचे कारण विचारण्यासाठी गेले असता मुलास तिक्ष्ण हत्याराने वार करून व आईला धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दिव्यकांत बागडे (वय-१७) जळगाव हा भाऊ घनश्याम विक्की बागडे आई यांच्यासह रहिवासाला आहे. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजता धनश्याम बागडे याला कासमवाडी येथे ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर सर्व रा. कासमवाडी यांनी काहीही कारण नसतांना मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिव्यकांत बागडे हा गेला असता तिघांनी मारहाण केली. यात ललित दिक्षीतने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने वार करून दिव्यकांत याला जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दिव्यकांतची आई निलम बागडे यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली व जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी ११ एप्रिल रोजी दिव्यकांत बागडे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर सर्व रा. कासमवाडी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.




















