रावेर : प्रतिनिधी
शहरातील स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्याची चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर शहरातील रसलपूर रस्त्यावरीलस्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारे ८ हजार रुपये किमतीच्या एकूण १२ लोखंडी जाळ्या संशयित आरोपी रफीक गढेवाला याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १३ एप्रील रोजी उघडकीस आली. याप्रकरणी वॉचमन सजंय वसंत महाजन (वय ४८) यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विष्णु भिल, विष्णु पोहेकर तपास करीत आहे.