
जळगाव मिरर | २६ मे २०२६
आई-वडिलांची चारधाम यात्रा सुखरूप, मंगलमय आणि आनंददायी व्हावी ही प्रत्येक मुलाची भावना असते. परंतु या यात्रेनंतर होणारा अनावश्यक खर्च, मोठे स्वागत समारंभ आणि दिखाऊ कार्यक्रम टाळून समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा निर्णय घेतला, तर त्यातूनच खऱ्या अर्थाने पुण्याची कमाई होते याचा जिवंत आदर्श अविनाश किरण जावळे यांनी घालून दिला आहे.
आई-वडिलांची चारधाम यात्रा सुखरूप पूर्ण झाल्यानंतर कोणताही रिकामा खर्च किंवा भव्य स्वागत न करता, त्यांनी समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन बँक’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला सुरुवातिला च ९वी आणि १०वी च्या विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तक संच वाटप करण्यात आले.
या ‘एज्युकेशन बँक’च्या माध्यमातून विशेषतः सफाई कामगारांच्या मुलांना इयत्ता ९वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत दिली जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अविनाश जावळे यांचे आई वडील जळगाव शहराचे माजी क्रीडा अधिकारी किरण जावळे, गिताबाई जावळे, भारती चौधरी, विशाल निकम, संदीप चौधरी, उपप्राचार्य आर. डी. देशमुख, धीरज जावळे, सौरभ चौधरी, पूनम भाटिया, वेदांत ताडे, दिशा ताडे, साक्षी ढिल्लोर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.




















