
जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२३
राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असताना पुन्हा एकदा देवदर्शनाला जात असलेल्या चार चाकी गाडी थेट झाडावर जाऊन आढळल्याने या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्तसमोर येत आहे तरी या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी असल्याचेही समजते ही घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात जवळील धोंडेवाडी परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लाकरेवाडी येथे बाळू मामाच्या मेंढराचे एक देवस्थान असून तेथे हे भाविक देवदर्शनासाठी जात असतानाच काळाने घाला घातला असून या अपघातातील मृत आणि जखमी हे बनपुरी, सिधेश्वर कुरोली येथील रहिवासी असल्याचे समजते. तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी वडूज आणि सातारा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.






















