जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२३
देशाची महत्वाकांक्षी चंद्रयान -3 मोहीम यशस्वी झाली असून देशभरातील अनेक ठिकाणी याचा जल्लोष केला जात असून जळगाव शहरातील आव्हाने शिवार परिसरातील श्री समर्थ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान -3ची प्रतिकृती तयार करून अभिनंदन केले आहे.
शहरातील आव्हाने शिवार परिसरातील श्री समर्थ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता-4थी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी उपक्रमाची यशस्वी लँडिंग होण्यासाठी द्रयान -3ची प्रतिकृती तयार करून अभिनंदन केले आहे.
या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सेच संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील, प्रशासकीय अधिकारी. छाया पाटील, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका.वैशाली शिंदे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका हर्षाली पाटील,तसेच शिक्षक.एस.एस.वंजारी,ए.बी.सूर्यवंशी,शिक्षिका एस.एल. भिरूड, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रार्थना केली.




















