जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३
प्रत्येक पती पत्नीचं नात खूप प्रेमळ व अतूट असते. चांगल्या वाईट परिस्थितीत दोघांनी या नात्यात मोठी साथ मिळत असते. यासाठी दोघांनीही एकमेकांना पूर्ण ओळखणे गरजेचे असते. अनेक लग्न समारंभात किंवा काही कार्यक्रमांमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला ओळखण्यास सांगतात. सध्या सोशल मीडियावर एका स्पर्धेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या महिलेला सर्वजण वाईफ ऑफ द इयर म्हणतायत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलीये. तिच्यासमोर कही माणसांचा घोळका उभा आहे. यामध्ये महिलेला आपल्या पतीला ओळखून दाखवायचे आहे.
आता डोळ्यांवर पट्टी बांधलेली असताना आपलं कितीही प्रेम असलं तरी पतीला ओळखणं थोडं कठीणच आहे. त्यामुळे या महिलेने पतीला ओळखण्यासाठी शक्कल लढवलीये. तिने डोळ्यांवर पट्टी बांधलेली असताना आपल्या डोक्याला हात लावत उंचीवरून पतीला ओळखलंय. महिलेचा पती तिच्यापेक्षा उंचीने थोडा लहान आहे. त्यामुळे आपल्या डोक्याला हात लावून समोरच्या व्यक्तीची उंची किती आहे हे ही महिला तपासतेय.
यामध्ये काही जण महिलेपेक्षा उंच तर काही जण महिलेच्याच उंचीचे असतात. थोडं पुढे आल्यावर अशा पद्धतीने ओळख पटवताना आपल्या पेक्षा लहान उंचीचा व्यक्ती महिलेला सापडतो. हाच आपला पती असल्याचं तिला समजतं आणि ती पतीला डोळ्यांवर पट्टी असून ओळखते. पतीला ओळखत असताना महिलेने लढवलेली शक्कल पाहून सगळेच थक्क झालेत. @snockys या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव केलाय. तसेच अनेकांनी महिलेचं कौतुक केलं आहे.