• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उद्या जळगावात एसडी-सीड तर्फे शिष्यवृत्ती वितरण : पद्मश्री मा.आनंद कुमारांची राहणार उपस्थिती !

इंजिनीअरिंग / मेडीकल तसेच सर्व प्रकारचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2023
in जळगाव
0
उद्या जळगावात एसडी-सीड तर्फे शिष्यवृत्ती वितरण : पद्मश्री मा.आनंद कुमारांची राहणार उपस्थिती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२३

गणितातील जगप्रसिद्ध प्राध्यापक, सुपर थर्टीचे जनक, तसेच गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न फुलविणारे व त्यांचे करिअर घडविणारे पद्मश्री मा. आनंदकुमारजी, पटना यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण आज सायं. ४.३० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, जळगाव येथे होणार आहे. या दरम्यान त्यांच्या प्रेरणादायी, अद्भूत आणि करिअरला नवीन दिशा देणाऱ्या जीवन प्रवासाचा पट प्रकट मुलाखतीद्वारे प्रसिद्ध निवेदिका, मुलाखतकार तसेच प्रेक्षकांचा सुसंवादिनी हा उस्फूर्त किताब प्राप्त असलेल्या सौ. मंगला खाडिलकर या उलगडणार आहे.

गणितातील जगप्रसिद्ध प्राध्यापक, सुपर थर्टीचे जनक, तसेच गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न फुलविणारे व त्यांचे करिअर घडविणारे पद्मश्री मा. आनंदकुमारजी, पटना यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण आज सायं. ४.३० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, जळगाव येथे होणार आहे.
· इंजिनीअरिंग, मेडीकल तसेच इतर प्रकारचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमके काय केले पाहिजे.
· गुणवत्तापूर्ण अभ्यास कसा करावा.
· यशस्वी विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असायला हवी.
‘डिनर विथ आनंदकुमार ‘
कार्यक्रमाला आलेल्या विदयार्थ्यांनी QR Code स्कॅन करून छोटासा गुगल फॉर्म भरायचा असून त्यातील निवडक पाच विदयार्थ्यांना आनंदकुमार यांचे सोबत डिनर घेण्याची संधी मिळणार आहे
मा. आनंद कुमार एकनिष्ठ व समर्पित असे गणित या विषयाचे शिक्षक की जे “सुपर थर्टी” या प्रणाली साठी नावाजले आहेत. डॉ.आनंद कुमार यांचा जन्म एक जानेवारी 1973 रोजी पटना (बिहार) येथे आर्थिक परिस्थितीने साधारण अशा कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोस्ट खात्यात नोकरी करीत होते. आनंद कुमार यांचे शिक्षण पटना येथील हिंदी मिडीयम च्या सरकारी शाळेत झाले. शाळेत असतानाच त्यांच्यामध्ये गणित या विषयाची आवड निर्माण झाली. गणित या विषयातील उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांचे ‘नंबर थिअरी’ मधील शोधनिबंध ‘स्पेक्ट्रम’ या अतिशय नावाजलेल्या गणित मॅगझिनमध्ये प्रकाशित झाले. त्यांना केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता परंतु वडिलांचे निधन व साधारण आर्थिक परिस्थिती यामुळे तेथे जाऊ शकले नाही. 1992 साली त्यांनी गणित विषय शिकवायला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी महिना 300 रुपये भाड्याची एक खोली घेतली तेथेच त्यांनी आपले स्वतःचे “रामानुजन स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स” सुरू केले. सदर संस्थेत सुरुवातीला फक्त दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले, परंतु संस्थेने उंच भरारी घेत केवळ तीन वर्षातच प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 500 पर्यंत गेली. दरम्यान ज्या गरीब विद्यार्थ्यांना आय.आय.टी. च्या प्रवेश परीक्षेची तयारी करायची होती, परंतु गरीबी मुळे ते फी भरु शकत नव्हते.असे काही विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आले. गरीबी मुळे काही हुशार व होतकरू विद्यार्थी या परीक्षेपासून व शिक्षणापासून वंचित राहतात.त्यांचे आयुष्य गरिबीमुळे उध्वस्त होते. आपण अशा गरीब पण हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही तरी ठोस पाऊल उचलल पाहिजे असा निर्धार त्यांनी केला व यातूनच जगप्रसिद्ध सुपर ३० या संकल्पनेची निर्मिती झाली.
आनंद कुमार यांच्या या थोर कार्याचा सन्मान देशातील व विदेशातील अनेक संस्थांनी केला. काही महत्त्वाचे पुरस्कार येथे नमूद करीत आहोत.
· २०१८ – दुबई येथील मलबार गोल्ड अँड डायमंड द्वारा “ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड 2018”
· २०१८ – भगवान महावीर फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल “महावीर पुरस्कार”
· २०१९ – कॅलिफोर्निया येथील फाउंडेशन फॉर एक्सलन्स(FFE) या संस्थेने “एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2019
· २०२२ – “गणित रत्न” पुरस्कार
· २०२३ – भारत सरकारने साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदान बद्दल “पद्मश्री ” देऊन गौरविले.
डॉ.आनंद कुमार यांचे कार्य व चरित्र इतके महान व उल्लेखनीय आहे की त्याची भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा दखल घेतली . त्यांचे कार्य व योगदान सिनेमाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले 2019 मध्ये दिग्दर्शक विकास भाई यांनी “सुपर थर्टी” हा चित्रपट आनंद कुमार यांच्या जीवन व कार्यावर प्रसारित केला. या चित्रपटात आनंदकुमार यांची भूमिका हृतिक रोशन या नावाजलेल्या कलाकाराने उत्कृष्ट साकारली आहे.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमीनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा श्रीमती मीनाक्षी जैन, गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

Tags: Anand kumarScholarshipSD-seed

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group