
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कुल येथे कार्यरत मुख्याध्यापिका सौ.प्रमोदिनी बळीराम पाटील यांनी बनावट SADM प्रमाणपत्राच्या आधारे व्यवसाय कर, (आयकर) आणि अश्या अनेक योजनांचा लाभ घेत असल्या बाबत जळगाव मिररला दाखल झालेल्या तक्रारी ची माहिती प्राप्त झाली.
योगेश पवार यांनी माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांचेकडे संबंधित व्यक्तीचे प्रमाणपत्र पडताळणी होणेबाबत अर्ज सादर केला होता. त्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने माध्य.शिक्षण विभाग जळगांव यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव यांचेकडून अहवाल मागितला
त्या तक्रारीच्या आधारे सदर व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र या कार्यालयाकडून देण्यात आलेले नाही, सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचा अभिप्राय नमूद केला आहे.
त्यानुसार तक्रारी संदर्भात कोणतीही कारवाई न करता खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर आणि माध्य. शिक्षण विभाग जि. प.जळगांव हे संगनमताने संबंधित मुख्याध्यापिका सौ.प्रमोदिनी बळीराम पाटील यांना आश्रय देऊन पाठीशी घालत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. ज्या प्रताप हायस्कुल मध्ये परम पूज्य साने गुरुजींनी ज्ञान दानाचे धडे दिले जगाला खरां तो ऐकची धर्म शिकावीला त्याचं जागेवर राहुन काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी मेवा खाण्यासाठी अक्षमापित कृत्य केल्याचे दिसून येते. खान्देश शिक्षण मंडळ या बाबत दखल न घेण्याचे मूळ कारण काय असावे. यामागे खान्देश शिक्षण मंडळाचे हाथ देखील काळे झाले आहेत कां? अशी चर्चा देखील अमळनेर शहरात सुरू आहे. सदर व्यक्तीवर शिक्षण विभाग व खान्देश शिक्षण मंडळ कारवाई करणार की गप्प बसणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.