जळगाव मिरर | २४ नोव्हेबर २०२३
राज्यात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना एक आणखी अशीच घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीने पीडितेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे. तिला उपचारासाठी अकोला येथील वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्यात आल आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष देऊन सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार केला आहे. तसेच तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. बालिका बेशुद्ध झाली, मात्र तिला मृत समजून आरोपीने पलायन केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून आवाज आला. त्याने घराची कडी उघडून पाहिल्यानंतर पीडित बालिका दिसून आली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.