जळगाव मिरर | ६ जानेवारी २०२४
जळगांव शहरात आज दि.६ जानेवारी रोजी कंजरभाट समाज युवा फाउंडेशन संस्थे तर्फे बैठकीचे आयोजन मेहरून येथील छत्रपती शिवाजी महाराज (सामाजिक वनिकरण) येथे आयोजित करण्यात आली होती
या बैठकीत प्रथम कंजरभाट समाज युवा फाउंडेशन चे लेटरहेडचे विमोचन समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बिरजू नेतलेकर व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेचे कार्या कश्या पध्दतीने करणार आहे विषयावर अध्यक्ष विजय अभंगे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यध्यक्ष शशिकांत बागडे, कार्यकारिणी सदस्य मोहन गारुंगे यांनी संघटनात्मक विचार प्रकट केले. सचिव राहुल नेतलेकर यांनी आपल्या भाषणात संस्था छोटी असो व मोठी पैसे अभावी छोटीच रहाते संस्थेचे व समाजाचे विकास करायचे असेल संघटीत असणे गरजेचे आहेत असे प्रतिपादन केले
त्या नंतर सदस्य नोंदणी कार्यक्रम घेण्यात आले कार्यकारिणी सदस्यांना वार्षिक ११००/- व सदस्यांना ३००/- रूपये आकारण्यात आले यात कार्यकारिणी सदस्य व सदस्यांना संस्थेचे प्रमाणपत्र, संस्थेचे ओळखपत्र, संस्थेचे स्टिकर लोगो,व एक वर्षाचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले व येत्या प्रजाकस्तक दिनानिमित्त कंजरभाट समाज मंदीर येथे चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचे आयोजिले आहेत सुत्र संचलन उपाध्यक्ष सचिन बाटुगे यांनी तर आभार कार्यध्यक्ष शशिकांत बागडे यांनी मानले.
या प्रसंगी संस्थेचे सहसचिव संतोष रायचंदे,खजिनदार योगेश बागडे,प्रदीप नेतले,गौतम बागडे,संदीप बागडे, संदीप गारुंगे,संतोष इन्द्रेकर, जयेश माछरे,निलेश बागडे,कार्तिक बाटूगे,गोपाल बाटूंगे अनिल नेतलेकर,नितीन नेतले, विकी दहियेकर,महेंद्र बागडे बापू बाटूंगे राज नेतले,गणेश बागडे,विनय नेतले, अर्जुन माछरे,शैलेश अभंगे, योगराज मलके, आदी समाजबांधव उपस्थित होते