जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेत जयश्रीताई सुनील महाजन महापौरपद उत्तमरीत्या भूषवित आहेत तर आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आल्याने शहर महानगरपालिकेत महिला राज आले आहे.

जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. यामुळे आयुक्तपदाची सूत्रे कुणाच्या हाती येणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, ३० रोजीच सायंकाळी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आला होता. आता त्यांच्याकडेच आयुक्तपदाची जबाबदारी आली असून नगरविकास खात्याने त्यांना महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती प्रदान केली आहे. अर्थात, त्या जळगाव महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. तर डॉ.गायकवाड यांची काम करण्याची पद्धत कशी असेल व शहराच्या विकासासाठी ते कसे नियोजन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दोनही महिला उच्चशिक्षिती
महानगरपालिकेत महापौर जयश्रीताई सुनील महाजन या शिक्षक असून ते महापौरपदी विराजमान झाल्यापासून शहरातील विविध विकासकामे त्यांच्या कार्यकाळात भरीव कामगिरी शहरात झाली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयात भेटायला येणाऱ्या नागरिकांना ते व्यवस्थित समजून घेऊन त्यांच्या प्रश्नावर पर्यायहि काढत असल्याने येथून परत जाणारे नागरिक समाधानी होऊन जात असतात. तर शहरातील घडलेल्या घटनेचा ते स्वतःहा आढावा घेऊन योग्य ती मदत करण्यास नेहमी पुढाकार घेतात. अजून काही शहराच्या समस्या आहे ते हि ती लवकर निकाली काढतील त्यांच्याकडे अजून १ वर्षाचा कालावधी आहे. तर दुसरीकडे आयुक्तपदाची सूत्रे डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आल्याने शहरातील रस्त्यासह नागरिकांच्या मूलभूत सुविदेसाठी काही विशेष नियोजन दोनही महिला तोडगा काढतील का ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.