जळगाव मिरर | २१ जून २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात तरुणांसाठी पोलीस भरतीची प्रकीया सुरु आहे. काही जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, राज्यातील काही ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे. मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालय व्यवस्था करायला सांगितले आहे’, असे त्यांनी जूनमध्ये पोलीस भरती घेण्यावर भाष्य केलं.
फडणवीस म्हणाले की, इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत आहे. यात एक कंपनी सरकारने तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा आणि सुव्यवस्था करता, तसेच गुन्हा झाल्यास सोडवणे करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते, त्याचे सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. फडणवीस म्हणाले की, आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलिस दल आपले असेल.प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो. काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल. वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल.