जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
देशातील अनेक राज्यात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरुणीचे प्रेमप्रकरण उघडकीस आल्यानंतर तिने तिच्याच आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, परिसरातून तरुणीच्या या कृत्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला व तिच्या प्रियकराला तिच्या आईने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर तिने जन्मदात्या आईचीच गळा घोटून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तरुणीला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील बल्लन गावातील आहे. या प्रकरणी माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) लक्ष्मी निवास मिश्रा म्हटले आहेत की, पोलिसांनी राजुलियाचा मृतदेह तलावाच्या जवळपास सापडला होता. या प्रकरणी खुलासा करताना पोलिसानी महिलेची मुलगी नीतू आणि तिचा प्रियकर अतुल अर्क यांना अटक केली आहे. तर, या घटनेतील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. महिलेच्या मुलीनेच तिचा गळा घोटला. त्यात तिच्या मानेचे एक हाड तुटले. तसंच, हत्येबद्दल कोणाला काही कळू नये व पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह तलावाच्या जवळ फेकला आणि तिथून फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी रात्री महिलेने तिची मुलगी आणि प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यानंतर तिने मुलीला समजावले होते तसंच, तिला ओरडाही दिला होता. व त्या मुलाला पुन्हा न भेटण्यासही सांगितले होते. त्यामुळं मुलगी तिच्यावर चिडली होती. या रागातूनच तिने व तिच्या प्रियकराने त्यांच्या आणखी एक मित्राच्या मदतीने महिलेची हत्या केली. दोघांना अटक करण्यात आली आहे मात्र तिसऱ्या साथीदाराचा शोध अद्याप सुरू आहे.