
जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
भावासह गल्लीतल्या मित्रांसोबत गच्चीवर पतंग उडवित असतांना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने लोक कैलास गिरगुणे (वय ७, रा. रामेश्वर कॉलनी) हा बालक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. या बालकावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पतंग आणि मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या वेगवेगळ्या घटना सायंकाळपर्यंत शहरात घडल्या असून जखमींवर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील कैलास गिरगुणे कुटुंबातही उत्साहाचा वातावरण होते. सकाळपासून त्यांची दान्ही मुले गल्लीतील काही मुलांसोबत गच्चीवर पतंग उडविण्याचा आनंद घेत होते. पतंग उडवित असलांना श्लोक गिरगुणे या सात वर्षीय बालकाचा गच्चीवरुन तोल गेला आणि तो थेट खाली जमिनीवर येऊन कोसळला. जमिनिवर असलेल्या फरशीवर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली व बेशुद्ध पडला. ही घटना त्याच्या कुटुंबियांसह शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी लोकला तात्काळ परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या लोकवर त्याला तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते, रात्रीपर्यंत तो बेशुद्धावस्थेतच होता अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. नवीन वर्षातील पहिला सण असल्याने श्रोष हा भावासह मित्रांसोबत पतंग उडविण्याचा आनंद घेत होता. गच्चीवरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने त्याचे कुटुंबीय व इतर सर्व जण बाहेर चिंतातूर असल्याचे चित्र रुग्णालयाबाहेर दिसून आले.