जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
गेल्या काही वर्षापासून आसाराम बापू प्रकरण देशभर चर्चेत येत होते. आता या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी आसाराम बापू (८६) याला २०१३ च्या बलात्कार प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच ३१ मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता, त्यानंतर उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि विनित कुमार माथूर यांच्या खंडपीठाने वैद्यकीय कारणास्तव शिक्षा (एसओएस) तात्पुरती स्थगित करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती आसारामच्या वकिलांनी दिली आहे. १२ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये आसारामला अटक झाल्यानंतर तो जामिनावर तुरुंगाबाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
“आम्ही रेग्युलर एसओएस अर्ज केला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याला तात्पुरता एसओस मंजूर केला होता. त्यामुळे गुजरातच्या प्रकरणात आम्ही जरी रेग्युलर एसओएस अर्ज दाखल केला असली तरी आम्ही तो वैद्यकीय कारणासाठीच सादर केला आहे आणि याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या ३१ मार्चपर्यंतच्या जामीनाची मागणी केली”, आसारामचे वकील निशांत बोरा यांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली.