जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
राज्यात गणेशोत्सव म्हटले की मुंबईत सर्वाधिक चर्चा असते ती लालबाग-परळ मधल्या लालबागचा राजा या गणपतीची. लालबागचा राजा गणपतीची मूर्ती, त्या मूर्ती भोवतीची आरास, सुंदर देखावा हे सर्व काही मन मोहून टाकणारा नजारा असतो. यंदाचे या मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.
लालबागचा राजाची पहिली झलक गुरुवारी सर्वांना पाहायला मिळाली. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे. लालबागचा राजा यंदा मयूरासनावर विराजमान आहे. राजाची एक झलक पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. लागबागचा राजाचा विजय असो मोरया.. अशा घोषणांनी लालबाग परिसर दणाणून गेला होता. या गणपती बाप्पांचे दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांना मिळाले.
लालबागचा राजाचे रुप साठवण्यासाठीही आपल्या मोबाईलमध्ये मंडळाच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट हा सोन्याचा आहे. देशातील श्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे.