
जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२४
राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची अंतिम टप्प्यात चाचपणी करीत आहे. मात्र जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी दोन उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु झाली असून यामध्ये पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून यातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघात दोन नावामध्ये चांगलीच रस्सीखेच होत असल्याचे समजत आहे. यात आ.राजूमामा भोळे व डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मोठी फिल्डिंग लावली गेली आहे. भाजपची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असून यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचा देखील उमेदवाराचे नाव असल्याचे समोर येत आहे.
गेल्या काही दिवसापासून डॉ.अश्विन सोनवणे यांना भाजपासहित शहरातील अनेक परिसरातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याचे मोठे पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसत असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर देखील कसली आहे. डॉ.अश्विन सोनवणे हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. डॉ.सोनवणे यांनी नेहमीच पक्षाचे ध्येय धोरण जळगावकरांपर्यत पोहचविण्याचे एकनिष्ठतेने काम केलेले असून त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून आहे.