जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२४
शाळेतून घरी आल्यानंतर विद्याथ्यनि एकांतवासाची संधी हेरुन गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, २५ रोजी दुपारी ही घटना घडली. सलग दुसऱ्या दिवसाच्या आत्महत्येच्या घटनेने शहर हादरले आहे. ओम पडित चव्हाण (वय १४, रा. गणेश कॉलनी) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नववी इयत्तेचा विद्यार्थी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पंडित चव्हाण हे ब्रोकर म्हणून कामकाज पाहतात. ते मुळ लिहेतांडा (ता.जामनेर) येथील आहेत. व्होडाफोन कार्यालयाच्या मागच्या गल्लीत गणेश कॉलनीत त्यांनी स्वतःचे घर घेतले आहे. या ठिकाणी पत्नी मुलगा, व मुलगी असे कुटुंब वास्तव्य करत आहे. ओम हा त्यांचा एकुलता एक होता. तो शहरातील आर. आर. विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. नेहमी प्रमाणे तो शाळेत गेला. त्यानंतर त्यांची बहिणही शाळेत रवाना झाली. पंडित सोनवणे यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती. त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला व पत्न ीची तपासणीसाठी चव्हाण दाम्पत्य दुपारी दवाखान्यात गेले होते. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. शाळा सुटल्यानंतर साई हा घरी आला. पाठीवरचे दप्तर काढले. घरात तो एकटाच होता. त्याने गळफास लावून घेतला.
हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्याला रिक्षात टाकुन तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. बेशुध्दावस्थेतील साई याला तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. त्यानंतर या घटनेची खबर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली. ही घटना कळताच साईच्या वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलगा अॅडमीट आहे, असे स्नेहींनी सांगितले असता मला पाहावयाचे आहे, असे म्हणत त्यांनी आक्रोश केला.