जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू आहे तर अनेक ठिकाणी अवैध वाहतुकीच्या माध्यमातून अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमची दुखापत निर्माण झाली आहे यावर जळगाव जिल्हा प्रशासन हतबल झाले की काय अशी चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात सुरू झाली आहे.
जळगाव जिल्हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने निमित्ताने चर्चेत येत असतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोरदार धुमाकूळ करीत आहे. यावर पोलीस प्रशासन असो की जळगाव जिल्हा प्रशासन असो यांची हतबलता दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूसह बेकायदेशीर गौण खनिज देखील सुरू आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका नियमित सुरू आहे नेहमीच एक ते दोन बळी महामार्ग घेत आहे. तरीदेखील जळगाव जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर येत कारवाई करीत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासन या अवैध माफियांसमोर हतबल झाले की काय असा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चिला जात आहे.
पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर येताच कारवाई थंडावते !
जळगाव शहर परिसरात अनेक ठिकाणाहून गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असतो हे पोलिसांच्या नजरेस येत असते मात्र काही वेळेस पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर एक कारवाई जोरदार करीत असते मात्र काही कालावधीने ही कारवाई थंडावत असल्याचे चित्र समोर येऊ लागत आहे. अपघात झाल्यापासून काही दिवस ही कारवाई इतकी जोरात चालते की आता वाळू बंद होणार मात्र काही दिवसाने पुन्हा जळगाव शहरात मुख्य रस्त्यावर वाळूचे ढिगारे मोठ्या प्रमाणात आढळून येते. मात्र यावर महसूल प्रशासन शून्य कारवाई करीत असल्याचे समोर येत आहे.
महसूल अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर हल्ले !
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास जात असताना वाळूमाफिया हल्ले करीत असल्याचे नेहमीच उघडकीस येत आहे मात्र तरी देखील महसूल प्रशासन या वाळू चोरांवर कारवाईचा सपाटा का लावत नाही हा देखील मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस महसूल अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास जातात त्यावेळेस पोलीस बंदोबस्त का नेत नाही हा देखील प्रश्न निर्माण होत आहे.