
जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत जखमी केले. ही घटना रविवार दि. २२ रोजी रात्री अकरा वाजता शहरातील शाहूनगर येथील ट्राफिक गार्डन जवळ घडली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरात ऋषिकेश रवींद्र मानकुंबरे (वय २०) हा तरुण रविवार दि.२२ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शाहूनगर येथील ट्राफिक गार्डन जवळून जात होता. त्याच्या दुचाकीचा समोरील एका अज्ञात व्यक्तीला कट लागला. या कारणावरून अज्ञात व्यक्तीने दुचाकीधारक ऋषिकेश मानकुंबरे याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून जखमी केले आणि पसार झाल. दरम्यान जखमी झालेल्या ऋषिकेशला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ऋषिकेश मानकुंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.