मेष : श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्ही मेहनतीने कठीण कामात यश मिळवाल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायात मनाप्रमाणे करार होतील. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम संभवतो.
वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सर्व कामे समजूतदारपणे आणि मनःशांतीने पूर्ण करू शकाल. नातेवाईक आणि समाजात तुमचा आदर राखला जाईल. शुभचिंतकांकडून मिळालेले आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील. आज कोणाशीही वाद घालू नका. व्यावसायिक कामांमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चिंता दूर होईल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. आर्थिक कामांवर लक्ष ठेवा. व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या असतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्य चांगले राहील.
कर्क : : श्रीगणेश सांगतात की, सकारात्मक विचार तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करतील. जवळच्या व्यक्तीकडून झालेली टीका तुम्हाला निराश करेल. कोणावरही विश्वास न ठेवणे चांगले. नोकरदारांनी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.
सिंह : : श्रीगणेश म्हणतात की, कोणतेही अशक्य काम अचानक पूर्ण झाल्यावर मनशांती लाभेल. तुमच्या वैयक्तिक बाबी उघड करू नका. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर ठेवा. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी, कागदपत्रे इत्यादींची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या संपर्कक्षेत्रात वाढ होईल. काही काळापासून सुरू असलेल्या कामातील अडथळेदूर होतील. आज प्रवास टाळणे हितकारक ठरेल. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
तूळ : आज कुटुंबासमवेत वेळ व्यतित कराल. संवाद कौशल्यातून आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळवू शकाल. रोजगाराच्या शोधात असणार्यांनी सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे संपूर्ण लक्ष गुंतवणूकीशी संबंधित कामांवर असेल. अति व्यावहारिक राहिल्याने नातेसंबंध बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. पती-पत्नीमध्ये छोट्याशा गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात. आरोग्य ठीक राहील.
धनु : श्रीगणेश म्हणतात की, मालमत्ता खरेदी करण्याची योजना असेल, तर आज सुरुवात करण्याची योग्य वेळ आहे. तरुणाईने त्यांच्या करिअरबाबत अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. तुमचे पूर्ण लक्ष व्यवसायिक कामांवर असेल. कुटुंब आणि व्यवसायात योग्य समन्वय राखला जाईल.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. मुलाच्या कारकिर्दीतही कोणत्याही समस्येवर तोडगा निघेल. तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल केल्याने तुमची कार्यक्षमता वाढेल. भावांसोबत वाद वाढू शकतात, धीर धरा आणि वृद्ध व्यक्तीला मध्यभागी ठेवा. गुंतवणूक धोरणांचा पुनर्विचार करा. जोडीदाराकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : श्रीगणेश सांगतात की, आज धार्मिक कार्यातील सहभाग तुम्हाला मानसिक शांती मिळवून देईल. कुटुंब आणि मुलांशी भावनिक बंध अधिक मजबूत होतील. व्यावसायिक कामांत यश मिळेल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
मीन : श्रीगणेश म्हणतात की, आज प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळेल. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. उत्पन्नाचे साधन कमी होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.