संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राज्यात पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. असे सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, प्रसाद लाड यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील काही मुद्दे
– २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती
– भाजप १०५ शिवसेना ५६ जागा अशा १६१ जागा आणि अपक्ष असे १७० जण होते. अपेक्षा होती की सेना-भाजप युती होईल. पंतप्रधानांनी तशी घोषणा केली. मात्र, निकालानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला
– बाळासाहेबांनी नेहमी ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं, हा जनादेशाचा अपमान होता
– जनतेने महाविकास आघाडीला नाही, तर युतीला मत दिलं होतं.
– अडीच वर्षात पायाभूत सुविधांना जागा मिळाली नाही प्रचंड भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्ट्चारात जेलमध्ये गेले, मनी लाँड्रिंगसाठी जेलमध्ये जाणं ही खेदजनक बाब
– शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं, पण राज्यपालांचं पत्र आलं, त्यानंतर कुठलीच कॅबिनेट घ्यायची नसते. विश्वासमत होईपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते.
– संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील ते निर्णय पुन्हा घ्यावे लागणार आहेत, पण त्याला आमचं समर्थनच आहे.
