
जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२५
कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गायी, ९ वासरे पोलिसांनी सोडवली असून या प्रकरणी गाडी चालक व मालकाविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पांढऱ्या रंगाची बोलोरो गाडी (एमएच ०४, एफयू- ६२१७) घेवून रायसिंग उर्फ भाया रामसिंग अजनारे व चालक आकाश बारेला हे मध्य प्रदेशमधून अहिरवाडी मार्गे महाराष्ट्रात गायी आणून कत्तल करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ अहिरवाडी गाठली रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाटील यांनी आहिरवाडीजवळ रात्री अडीच वाजता हे वाहन पकडले.
या गाडीमध्ये ६ गायी आणि ९ वासरे होती. दरम्यान, गाडी चालक अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पळून गेला. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाटील तपास करत आहे. या गुरांची सुटका करून त्यांना खानापूर येथील चोरवड नाक्याजवळील गो शाळेत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.




















