मेष राशी
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही कठोर परिश्रमाच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यातही रस वाढेल. यश मिळविण्यासाठी मर्यादा पाळणे आवश्यक आहे. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुमचे योगदान असेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे.
वृषभ राशी
श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. भूतकाळातील चुकांमधून शिकून तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत काही बदल कराल. जवळच्या नातेवाईकाशी असणारे मतभेदावरही पडदा पडेल. तरुणांना करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळेल. घाईघाईत घेतला निर्णय चुकीचा ठरू शकते. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा.
मिथुन राशी
श्रीगणेश सांगतात की, तुमची कामे योग्यरित्या करण्यासाठी नियोजन करा. मालमत्ता खरेदीच्या विचारात असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. तरुणांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळेल. बाहेरील लोकांचा किंवा मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी फारसा लाभदायक ठरणार नाही, याची जाणीव ठेवा. जवळच्या नातेवाईकांशी मतभेद टाळा. कुटुंबासोबत मनोरंजनात आनंदी वेळ व्यतित कराल.
कर्क राशी
श्रीगणेश म्हणतात की, कुटुंबाशी संबंधित कोणताही वाद वडीलधाऱ्यांच्या मदतीने सोडवता येईल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. इच्छेनुसार यश न मिळाल्याने विद्यार्थी तणावात राहतील. कोणत्याही कामात जोखीम घेण्याचा प्रयत्न करू नका. मुलांचे मनोबल उंचावण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक कामे सामान्य राहतील.
सिंह राशी
आज तुम्ही काम असूनही तुमच्या आवडीनिवडींसाठी वेळ काढाल. तुम्ही सर्वोत्तम पालक असल्याचे सिद्ध कराल. अनुभवी आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. मालमत्तेशी संबंधित कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. पती-पत्नीमधील नात्यात काही वाद निर्माण होऊ शकतात.
कन्या राशी
श्रीगणेश म्हणतात की, नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या कठोर परिश्रमामुळे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. सामाजिक सेवा संस्थेसोबत एका विशेष कामातही योगदान द्याल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. कुटुंबातील मतभेद सोडवल्याने परिस्थिती लवकरच अनुकूल होईल. वाहन खरेदीसाठी अनुकूल दिवस नाही. कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.
तूळ राशी
श्रीगणेश सांगतात की, न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. दिवसभर मनानुसार घालवल्याने ताण कमी होईल. समाजातही तुमचा आदर वाढेल. कोणताही प्रवास टाळा. घराशी संबंधित कामे जास्त खर्चाची होऊ शकतात. तुमच्या आग्रही स्वभावाचा नातेसंबंधावर परिणाम होण्याची शक्यता.
वृश्चिक राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज झालेले काही नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि विचारातही नावीन्य येईल. तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही उघड करू नका. मुलाच्या कोणत्याही नकारात्मक कृतीमुळे मन अस्वस्थ होईल. धार्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला अधिक आराम मिळेल. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका.
धनु राशी
श्रीगणेश सांगतात की, आज कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही कठीण काम पूर्ण कराल. पूर्ण आत्मविश्वासाने प्रयत्न करत रहा. नातेवाईक आणि मित्रांसोबत थोडा वेळ व्यतित करा. दुपारनंतर अप्रिय बातमी मिळाल्याने मन निराश होईल. कठीण काळात विश्वासू मित्राचा सल्ला घ्या. व्यवसायात इच्छित यश मिळाल्याने आत्मविश्वास दुणावेल.
मकर राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे रखडलेले काम पूर्ण मित्रांची मदत घ्या, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घराची योग्य व्यवस्था राखाल. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. जवळचे नातेवाईक तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊ शकतात. व्यवसायात तुमचे निर्णय अचूक ठरतील.
कुंभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सामाजिक कार्यात योगदान द्याल. बाहेरील कामांसोबतच घर आणि कुटुंबाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नकारात्मक कृत्यात सहभागी असणार्या लोकांपासून दूर राहा. अन्यथा तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कोणताही प्रवास टाळणे चांगले. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन राशी
आज ग्रहमान अनुकूल आहे. कोणत्याही वैयक्तिक समस्येवर मात करण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम यशस्वी होतील. वंशपरंपरागत कामे पूर्ण होऊ शकतात. कोणाशीही चुकीचा वाद घालू नका. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहू शकता. दुपारनंतर कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. भागीदारीशी संबंधित कामे सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे.