जळगाव मिरर टीम विशेष
ना. एकनाथ शिंदे यांनी प्रगतशील महाराष्ट्राचे २० मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मी एकनाथ संभाजीराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… असं त्यांनी म्हणताक्षणी त्यांच्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी आणि कर्मभूमी ठाण्यात दिवाळीला सुरुवात झाली.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी वार्तालाप करताना शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करेन, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या गावातील एकनाथाने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दरेवासियांची छाती गर्वाने फुलली होती. एकनाथ शिंदे वर्षातून एकदा त्यांच्या कुटुंबियांसह दरे या त्यांच्या गावी येतात. शेतात रमतात. त्यांचे शेतात राबतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मुळ दरे या गावी येतात, त्यावेळी शेतात काम करताना दिसतात. गावी आले की ते शेतातच राहतात. दिवसभर आपल्या कुटुंबासह शेतात काही ना काही काम करतात.

वर्षातून एकदा आपल्या गावी जाऊन काळ्या आईची सेवा ते करत असतात, यावेळेस त्यांचे सोबत पत्नी लताताई, मुलगा डॉ श्रीकांत, सून वृषाली व नातू रुद्राक्ष हे सर्व शेतात जिथून शिंदे परिवार आले आहे त्या गावात जाऊन जमिनीवर पाय अजूनही घट्ट रोवून ठेवले आहे . त्यामुळे लोकांना हा नेता आपलासा वाटतोय.





















