
जळगाव मिरर | १५ जून २०२५
स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव शाखा आणि रेडक्रॉस जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जून 2025 रोजी, जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता जळगाव मुख्य शाखा परिसरात भरवण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष सामाजिक बांधिलकी जपत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. “समाजाचे देणे लागतो” या भावनेतून एकूण 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. या उपक्रमात जळगाव शहरातील एसबीआयचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या सोबतच चोपड़ा येथे 71 तर चाळीस गाव येथे 27 रक्तदात्यांनी देखील रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक श्री. धर्मेंद्र कुमार, श्री. युवराज चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय प्रशासनिक कार्यालय जळगाव येथील अधिकारी श्री. आशिषजाधव, श्री. अमोल महाजन, श्री. पंकज नहाले श्री. सुयोगपाटील, श्री. सुमित ओक श्री. शफीक पिंजारी , श्री. कल्पेश लंके आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या आयोजनात रेडक्रॉस तर्फे श्री विनोद बियाणी व त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले. या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेस चालना मिळाली असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या महिन्यात अजून काही शिबिरांचे आयोजन एसबीआई मार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.




















