• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२५

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. तेजस गजानन महाजन (वय १३) असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  तेजस हा आपल्या आई-वडील व बहिणीसह रिंगणगाव येथे राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेतीकामासोबतच कृषी केंद्र चालवतात. सोमवारी (दि. १६ जून) त्यांनी तेजसला दुकानावर ठेवून कामानिमित्त जळगावला प्रस्थान केले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी परतेल, अशी अपेक्षा होती. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत रात्रभर शोध घेतला. दरम्यान, एरंडोल पोलिसांत तक्रार दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

मंगळवारी पहाटे खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेमागे अंधश्रद्धेच्या पार्श्वभूमीवर नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बालकाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे व कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. या खुनामुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच संपूर्ण तथ्य समोर येण्याची अपेक्षा आहे.

Related Posts

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group