• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : दिग्गज नेत्याचा फोटो वापरून लाभार्थीची आर्थिक लुट ?

नेत्याच्या कार्यकर्त्याचा नवा उद्योग : लाभार्थीकडून पैसे घेवून दिले जात आहेत भांडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : दिग्गज नेत्याचा फोटो वापरून लाभार्थीची आर्थिक लुट ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२५

जिल्ह्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात आता लाभार्थी कामगारांना भांडी वाटप मोफत देण्याचे आदेश असतांना देखील शहरापासून नजीक असलेल्या एका गावातील एका ठिकाणी २०० रुपये देवून भांडी कामगारांना मिळत होती. विशेष म्हणजे या ठिकाणी जे कर्मचारी पैसे घेत होते त्यांच्या खिश्यावर व मोबाईलवर जिल्ह्यातील एका नेत्याचे फोटो लावलेला होता. म्हणजे त्या नेत्याच्या फोटो व नावावर हि लाभार्थीची आर्थिक लुट सुरु असल्याचे चित्र आज दि.२२ रोजी सकाळी समोर आले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो.  तर जळगाव शहरापासून नजीक असलेल्या एका ठिकाणी आज सकाळी ९ वाजेपासून कामगारांना भांडी वाटप सुरु करण्यात आले होते. यावेळी शेकडो कामगारांनी लांबच लांब रांग लावून ठेवली होती. यावेळी शेकडो लाभार्थ्यांनी या ठिकाणी २०० रुपये भरून भांडी घेण्याचा लाभ घेतला तर याठिकाणी काही महिलांशी संवाद साधला असता, नाव न सांगण्याच्या अटीवर  ते म्हणाले कि, यापूर्वी नोंदणी व केवायसी करण्यासाठी एकूण एक हजार १०० रुपये तर भांडी घेतांना २०० रुपये व शिक्का घेण्यासाठी ५० रुपये प्रत्येक लाभार्थीकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय योजनेचा चांगलाच फज्जा जळगाव शहरात उडत असल्याचे समोर आले आहे.

समाजसेवा झाले कमाईचे साधन ?

या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते व काही दिग्गज नेत्यांचे कार्यकर्ते म्हणत होते कि, हे सामाजिक कार्य सुरु आहे मात्र या सामाजिक कार्याच्या नावावर जे लाभार्थी दिवसाला २५० ते ३०० रुपये कमवितात, त्यांच्याकडून जर इतकी मोठी लुट होत असेल तर हि कुठली समाजसेवा हे नेत्यांचे कार्यकर्ते करत आहे हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आता समाजसेवा देखील कमाईचे साधन झाले कि, काय ? असा प्रश्न सर्वसामान्याना पडत आहे.

नेत्याचा फोटो व बॅच लावून लाभार्थींची फसवणूक !

एका नेत्याचा फोटो व बॅच लावून येथील एक कर्मचारी लाभार्थीकडून २०० रुपये घेवून त्यांची फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार आज दि.२२ रोजी सकाळी उघडकीस आला आहे. त्यामुळे हि लाभार्थींची जी फसवणूक होत आहे हि त्या नेत्याला माहित आहे का ? हा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group