जळगाव मिरर | २६ जून २०२५
आज दि 26/06/2025 रोजी जळगाव शहरातील क्षितिज युवा फाउंडेशनच्या वतीने मेहरून परिसरातील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे 100 गरजू गरीब मुला – मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सचिन लाडवंजारी यांच्या वतीने 25 मुला मुलींना दप्तराचे वाटप करण्यात आले.
यावेळी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभेच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी, माजी महापौर सिमाताई भोळे, माजी महापौर सदाशिवराव ढेकडे, माजी नगरसेवक राजेंद्रभाऊ घुगे पाटील, जितेंद्रभाऊ मराठे, भाजपा मंडल अध्यक्ष विनोदभाऊ मराठे,भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेशभाऊ पाटील, माजी सैनिक किशोरभाऊ ढाकणे, विद्यालयाचे संचालक अशोकभाऊ लाडवंजारी, क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, भारतीय मजदूर संघाचे माजी प्रदेश सचिव सुरेशभाऊ सोनार, ज्ञानेश्वरभाऊ पाटील, मोहनभाऊ गारुंगे, सचिनभाऊ लाडवंजारी, बाळाजी सानप, रामचंद्रभाऊ वंजारी, वासुदेवभाऊ सानप, संध्याताई नाईक, संतोषभाऊ चाटे, उपस्थित होते. यावेळी मनोगतात बोलतांना खासदार स्मिताताई वाघ यांनी क्षितिज युवा फाउंडेशनने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर, ईश्वरी लाडवंजारी मॅडम, गणेश आंधळे सर, अमित तडवी सर, संजय बडगुजर सर, दिनेश पाटील सर, सरस्वती पाटील मॅडम, ढाके मॅडम, प्रणाली पालवे मॅडम, राजश्री तायडे मॅडम, सनो पिंजारी मॅडम, मोतीलाल पाटील, संतोष चाटे, विनोद इखे,यांचे सहकार्य लाभले. यावेळी सूत्रसंचालन अतुल चाटे सर यांनी केले तसेच आभार किरण पाटील सर यांनी मानले
