• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : आजीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या नातवाला अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
खळबळजनक : आजीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या नातवाला अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८  जून २०२५

शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धरणगाव शहरात गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ला वृध्द महिला ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल  करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील महाबळ परिसरातील लीलाबाई रघुनाथ विसपुते (वय-७०) या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होत्या. धरणगावात त्याची मुलगी वैशाली विलास पोतदार यांच्याकडे २५ जून रोजी मुक्कामीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, वैशाली पोतदार यांचा मुलगा आरोपी तेजस पोतदार हा त्यांचा लहान मुलगा असून, तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. या गुंतवणुकीमुळे त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज केले होते. तेजस एक वर्षापूर्वी जळगाव येथे मामाच्या घरीसहा महिने राहिला होता. त्यावेळी देखील काही लोक त्याच्याकडे पैशांच्या मागणीसाठी येत असत. यामुळे आजी लीलाबाई तेजसला नेहमी व्याजाने पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याबद्दल बोलत असत. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता.

तेजसने आजी झोपेत असतांना तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून जखमी केले. बाजूलाच कुऱ्हाड ठेवली आणि भाऊ याच्याकडे पळत आला आणि आजीवर कुणीतरी कुऱ्हाडीने हल्ला केला असा बनाव केला. रक्ताच्या थारोळ्या गंभीर अवस्थेत पडलेल्या वृध्द लिलाबाई यांना तातडीने रूग्णवाहिकेतून जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी झालेल्या वादातून रागाच्या भरात तेजसनेच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे अक्षय पोतदार यांने सांगितले.

गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर लीलाबाई बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेजस हा कु-हाड घेवून आल्याचे त्यांचा भाऊ अक्षयने पाहिले होते. त्यावेळी मी पिंपळाचे झाड तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खाली निघून गेला आणि त्यानंतर अक्षय हा अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. याप्रकरणी जखमी लिलाबाई यांच्या मुलाचा मुलगा उमेध धीरेंद्र विसपुते रा. महाबळ याने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तेजस विलास पोतदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी तेजस पोतदार याला अटक केली असून पुढील कारवाईला सुरूवात करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group